रविवार, २५ सप्टेंबर, २०११

मन प्रकाशले...

काल आयडीयल मध्ये गेलो होतो, अचानक श्री प्रकाश आमटे यांच्या "प्रकाशवाटा" या पुस्तकावर लक्ष गेलं. आपोआपच हात पुस्तकाकडे गेला. आयडीयल मधल्या काकांना पुस्तक बांधून द्यायला सांगीतलं.

स्टेशनला येऊन बोरीवलीला जाणारी गाडी पकडली, पंण आत चढल्या चढल्या लगेच बाधूंन घेतलेलं पुस्तक उघडलं आणि बास. कालपासुन फक्त पुस्तक वाचतोय बाकी सगळी कामं ठेवली...

आता एक दोन प्रकरणचं बाकी आहेत...
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा