शनिवार, १७ सप्टेंबर, २०११

एका मागून एक, सगळे ऊपाय फेक.

                       !!श्री!!

का मागून एक, आधी मुंबई, नन्तर दिल्ली, आता आग्रा,
    पुढे काय? कोणास ठाऊक, बहूतेक यमालाच. ह्या अतिरेक्यानी त्याच काम सोप केलय. एका वारीत २०-२५ सहज. आणि ह्या कमाचा मोबदलाही फक्कड, बीर्याणी, कोंबड्या. आयुष्यभर सरकारी पाहूणे, भारतीय करतयत पहूणचार. खरे यमदूतही त्यांची ही सरबरई पाहून वैतागलेत अशी बातमी आहे.

वेनसडे सारखा ऊपाय शोधायला लागल? की आणखी काही?

येथे मुंबईत झालेल्या बहूतेक सर्व स्पोटांची आणि झालेल्या हानीची यादी आहे,

स्पोटात म्रुत्यु पावलेल्या बंधु आणि भगीनींस  श्रध्दांजली!!!




माझा पहीला ब्लॉग

               !!श्री!!
नमस्कार मित्रहो,
मी किरण अजितकुमार दामले, 


काय लिहू कळत नाही, ४ वेळा खाडाखोड केली तरी अजुन काही जमतयस वा़टत नाही.
खूप दीवसानी लीहायला घेतलय. बहुतेक BA च्या पहिल्या वर्षानतर आत्ताच, बघुया प्रयत्न करून

बर वाटतय फार, मराठीत टंकलेखन करायला तर खुपच गम्मत वाटतेय तेही ईंग्रजी कळपटावर अंदाजे एक एक कळ दाबत, बँकस्पेस करत. एंवढा मजकुर लिहायला १ तासच्यावर लागला,

आता जरा जमायला लागलय, बघुया रोज काही खारडता येतय का?